महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


९ मे महत्वाच्या घटना

१८७४ : मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम सुरू झाल्या.

१८७७ : पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

१९०४ : वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.

१९३६ : इटलीने इथिओपिया देश बळकावला.

१९५५ : पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.

१९९९ : अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.

१९९९ : ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

९ मे जन्म

१५४० : मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)

१८१४ : अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२)

१८६६ : थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)

१८८६ : स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ – पुणे)

१९२८ : समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१०)

१९५५ : इथिओपिया देशाचे पंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी मेलेस झेनावी यांचा जन्म (मृत्यू : २० ऑगस्ट २०१२)

१९३९ : ऑस्ट्रेलियन मोटरबोट रेसर, पाण्यावरील २७५.९७ नॉट्स वेगाचा जागतिक विक्रम करणारे केन वॉर्बी यांचा जन्म

१८८२ : कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियमचे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचा जन्म (मृत्यू : २४ ऑगस्ट १९६७)

१८१४ : इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म (मृत्यू : १७ ऑक्टोबर १८८२)

९ मे मृत्यू

१३३८ : भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.

१९१७ : डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.

१९१९ : रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८६१)

१९३१ : वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८५२)

१९५९ : थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)

१९८६ : एवरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेलसिंग नोर्गे यांचे निधन. (जन्म: २९ मे १९१४)

१९९५ : दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)

१९९८ : पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९२४ – लखनौ, उत्तर प्रदेश)

१९९९ : उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.

२००८ : किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे निधन.

२०१४ : भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)

२०११ : बोलिव्हिया देशाचे १ल्या महिला राष्ट्राध्यक्ष लिडिया गुइलर तेजादा यांचे निधन (जन्म: २८ ऑगस्ट १९२१)

२००४ : चेचन प्रजासत्ताक देशाचे १ले अध्यक्ष, चेचन धर्मगुरू आणि राजकारणी अखमद कादिरोव यांचे निधन (जन्म: २३ ऑगस्ट १९५१)

१९७६ : जर्मन अत्यंत डावे दहशतवादी, रेड आर्मी गटाचे सहसंस्थापक, पत्रकार उल्रिक मेनहॉफ निधन (जन्म: ७ ऑक्टोबर १९३४)

१९२७ : बव्हेरियाचे राजकुमार प्रिन्स कार्ल यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १८७४)

१९०५ : मातृदिन(मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचे निधन (जन्म: ३० सप्टेंबर १८३२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos