महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज-आरमोरी मार्गावर दुचाकीवर रुग्णवाहिकेची भीषण धडक : कंत्राटदाराचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वडसा : काम संपवून गावाकडे परतणाऱ्या ३८ वर्षीय घर बांधकाम कंत्राटदार गुरुदेव दिनाजी वसाके यांचा रविवारी (३) दुपारी सुमारे ३:३० वाजता रुग्णवाहिकेत जोरदार धडक बसून जागीच मृत्यू झाला.

माहितीनुसार, गुरुदेव वसाके हे देसाईगंज शहर आणि परिसरात घर बांधकामाची कंत्राटे घेऊन काम करत होते. गांधी वॉर्ड, देसाईगंज येथे सध्या त्यांचे बांधकाम सुरू होते.

रविवार असल्यामुळे त्यांनी मजुरांचा आठवडी पगार देण्यासाठी बांधकाम स्थळी भेट दिली. काम संपवून गावाकडे परतत असताना देसाईगंज-आरमोरी मुख्य मार्गावर, गावापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर, लहरी कारखान्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

भीषण धडकेमुळे दुचाकी चक्काचूर झाली आणि गुरुदेव रस्त्यावर दूरवर फेकले गेले. त्यांच्या नाका-तोंडावाटे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात  हलवले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे प्राण गेले.

देसाईगंज पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या रुग्णवाहिकेला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos