कामठी येथील आयटीआयच्या इमारतीचे १९ एप्रिल रोजी लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे १९ एप्रिल रोजी लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, वित्त व नियोजन राज्य मंत्री अँड आशिष जयस्वाल, राज्यसभा सदस्य माया इवनाते, खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संदिप जोशी, कामठी नगराध्यक्ष अजय अग्रवाल, येरखेडा नगराध्यक्ष राजकिरण बर्वे, शहीद हेमंत करकरे यांचे शिरिष करकरे, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होईल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडताना थोर भारतीय विचारवंत, समाजसेवक आणि शहीदांचा योग्य सन्मान करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. या संकल्पनेला पुढे नेताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागाने राज्यातील आयटीआयचे महान विभूतींच्या नावाने नामकरण करण्याचा राज्यव्यापी कार्यक्रम घेतला असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
News - Nagpur




Petrol Price




