महत्वाच्या बातम्या

 अमरावतीची तहान भागली : आमदार राजे डॉ. धर्मराव बाबा आत्रामांच्या प्रयत्नांना यश 


- नवीन बोरवेलचे भूमिपूजन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : अमरावती गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येवर अखेर दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून गावात पाण्याची गंभीर टंचाई भासत होती, ज्यामुळे ग्रामस्थांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही गंभीर बाब गावातील माजी मंत्री व आमदार राजे डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी तत्काळ या समस्येवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर अमरावतीसाठी नवीन बोरवेल स्थापनेसाठी निधी मंजूर करण्यात आला.

या महत्वाच्या विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात गावकऱ्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ग्रामस्थांनी आमदार आत्राम यांचे आभार मानले आणि त्यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त केला.

भूमिपूजन समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या प्रसंगी सांगितले की, गावाच्या विकासासाठी आमदार आत्राम यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न भविष्यातही अशीच सुरू राहतील.

यावेळी एकदा पुन्हा सिद्ध झाले की, जनतेच्या प्रश्नांवर तत्पर, विकासाच्या कामात अग्रस्थानी अशी ओळख आमदार राजे डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी कायम राखली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos