महत्वाच्या बातम्या

 ताडगाव येथे महापुरुषांच्या विचारांचा जागर : एक अभूतपूर्व सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड (ताडगाव): ताडगाव ग्रामवासीयांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महापुरुषांच्या  एका भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा केवळ एक उत्सव नसून, तो सामाजिक प्रबोधन आणि एकतेचा एक सुंदर संगम ठरला.

कार्यक्रमाची गौरवशाली सुरुवात ध्वजारोहणाने झाली. ताडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रणजीत मस्के यांनी जय भीम ध्वजाचे ध्वजारोहण केले, तर कोरके दामा आत्राम यांच्या हस्ते जय सेवा ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संपूर्ण गावाने त्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी भामरागड नगरपंचायतीचे उपाध्यक्ष विष्णू मडावी, बांधकाम सभापती तेजस्विनी मडावी, सभापती कविता येतमवार आणि जगदिश कोंकमुट्टीवर, मनीष येमुलवार, सैनू आत्राम, महारू आत्राम, सुरेश आत्राम, प्रविण सेगन, डॉ यादव वनकर, उमेश वनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मान्यवरांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन. मुक्तेश्वर वनकर यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, लालसुजी आत्राम यांनी डॉ. बाबासाहेबांच्या त्यागाची गाथा मांडली, तर अर्जुन आलम यांनी संविधान आणि आरक्षण या विषयावर सखोल भाष्य केले. रवि सेगम यांनी महापुरुषांच्या सामाजिक वारशावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्रभारी अधिकारी रणजित मस्के यांनी सामाजिक सलोखा आणि शिस्तीचे महत्त्व सांगितले. गावकऱ्यांच्या अफाट जनसमुदायाने आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच शोभा यात्रा काढत भीम गर्जना झाली.

कार्यक्रमाची रंगत टिकवून ठेवण्यात रवि सादामवार यांनी  सूत्रसंचालनाचा मोठा वाटा होता.  तसेच, कार्यक्रमाच्या शेवटी आशिष वनकर यांनी आलेले मान्यवरांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला  हेमंत पागडे, सुधीर आत्राम, संतोष कोर्सा, ललित बंडावर, दिगंत येतमवार, किंकर मिर्धा, सुनील मडावी, संतोष माजी, जयंत पगडे, राकेश संगमवार, विनोद पडलवार, तन्मय सेगन आणि अर्जुन उईके अशा अनेक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वी केले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद चा आयोजन समिती कडून करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos