विदर्भात ४०°C पेक्षा जास्त उष्णतेची लाट : नागरिकांनी काळजी घ्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यात पुढील ४ ते ५ दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. विदर्भातील काही भागात पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला असून, कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना आवाहन केले आहे की, उन्हाच्या तीव्रतेपासून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. त्यांनी काही महत्वाच्या खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत:
दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.
खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी उष्णतेच्या तीव्रतेनुसार कामाचे वेळापत्रक बदलावे.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
बाहेर पडताना सुती कपडे घाला, टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
विदर्भातील नागरिकांसह राज्यातील सर्व नागरिकांना डॉ. धर्मराव बाबा आत्राम, आमदार, अहेरी विधानसभा क्षेत्राने विशेष आवाहन केले आहे की, उन्हाच्या प्रचंड तापमानात सुरक्षित राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.
News - Gadchiroli




Petrol Price




