महत्वाच्या बातम्या

 मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या निवासाचा प्रश्न मार्गी : डॉ. पंकज भोयर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्ध्यातील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह १९६७ पासून भाड्याच्या किंवा जुन्या इमारतीत सुरू होते. या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मात्र, आता सामाजिक न्याय विभागाने निधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावणारी दोन भव्य शासकीय वसतिगृहे लवकरच साकारली जाणार आहेत.

महादेवपुरा आणि नालवाडी परिसरात प्रत्येकी २५० प्रवेश क्षमता असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाच्या इमारती आगामी काळात तयार होतील, असे ते म्हणाले वर्धा हे शैक्षणिक केंद्र असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओढा मोठा आहे. हे लक्षात घेता, अस्तित्वात असलेल्या शासकीय वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढवून मिळावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्र्यांकडे केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वसतिगृहाच्या इमारतीचे भुमीपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos