अड्याळ पोलिसांचा सुगंधित तंबाखू तस्करीवर मोठा धाडस : १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालक फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पोलिस स्टेशन अड्याळ हद्दीत गस्तीदरम्यान पोलिसांनी सहा लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करून मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात वाहन चालक फरार असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ पोलिसांना गस्तीदरम्यान विरुद्ध दिशेने येणारे ग्रे रंगाचे फोर्स वन न्यू बॅण्ड चारचाकी वाहन (क्रमांक एम एच ०२ सी एल ८०७८) संशयास्पद वाटले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वेग वाढवून पळ काढला. काही अंतरावर वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून चालक पसार झाला.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या ३२, पांढऱ्या रंगाच्या ११ चुंगळ्या तसेच दोन मोठ्या कागदी बॉक्समध्ये १३,३५० रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला. वाहनाची किंमत अंदाजे ८ लाख रुपये असून, एकूण १४ लाख १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई व तपास -
सरकारतर्फे फिर्यादी म्हणून ठाणेदार धनंजय पाटील यांनी अड्याळ पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम १२३, २२३, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल मांदाळे करीत आहेत.
अड्याळ मार्गावरून सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा आहे. या मागे मोठ्या लोकांचा सहभाग असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. आरोपी चालक गेल्या तीन दिवसांपासून पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारमध्ये सुगंधित तंबाखू नेऊन चालक कुठे जात होता याचा शोध घेणे पुढील महत्त्वाची पोलिस कारवाई ठरणार आहे.
News - Bhandara




Petrol Price




