गडचिरोलीत धानोरा मार्गावर दुचाकीला मागून कारची धडक : जावई-सासू जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मेंढा गावाकडे जाताना धानोरा मार्गावरील एका जीमसमोर दुचाकीवर मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली, ज्यात जावई आणि सासू जखमी झाले. ही घटना ५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
जखमी जावईचे नाव रूपेश दिवाकर भुरले (३०, रा. मेंढा, ता. गडचिरोली) आणि सासूचे नाव शशिकला निंबाजी चलाख (५०, रा. कापशी, ता. सावली, जि. चंद्रपूर) आहे. ते दोघे कौटुंबिक कामानिमित्त गडचिरोलीहून मेंढा येथे दुचाकीवरून (एमएच ३३ एजे-२७९६) जात होते.
धानोरा मार्गावर जीमसमोर मागून येणाऱ्या कारने (सीजी ०८ एएफ-५७७८) त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कार चालक न थांबता घटनास्थळ सोडून निघून गेला. जखमी जावई-सासूवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कारचा शोध सुरू केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




