भंडारा : नवीन बायपासवर दुचाकी-कार अपघात : ४६ वर्षीय महादेव तरोणे गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपासवर २ एप्रिलला दुपारी १:५० वाजता दुचाकी आणि स्विफ्ट कारचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक महादेव उदाराम तरोणे (४६, एकोडी, ता. साकोली) गंभीर जखमी झाले.
माहितीनुसार, तरोणे भंडाऱ्याहून गावी जात असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच ३६-ई १३७२) मागून आलेल्या स्विफ्ट कारने धडक दिली. या धडकेमुळे त्यांना हात-पायावर गंभीर दुखापत झाली.
माहिती मिळताच, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने त्वरित त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलवले, जिथे त्यांचा प्राण वाचवण्यात आला. डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांमुळे महादेव तरोणे यांचे प्रकृती स्थिर आहे, मात्र हात-पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
पोलीस अपघाताचे कारण आणि जबाबदार चालकांची माहिती संकलित करण्यासाठी तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




