भंडारा जिल्ह्यात पोलिसांची धाड : जुगार व दारू अड्यावरून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा पोलिसांनी जवाहरनगर, कारधा, तुमसर आणि पवन पवनी येथे जुगार अड्यांवर धाड घालून ८ हजार ०९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचबरोबर, भंडारा व जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीतील दारू अड्यांवर धाड टाकून १ लाख ०३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण मिळून जुगार व दारू अड्यांवरून पोलिसांनी १ लाख ११ हजार ९०२ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठाणेदार व अंमलदारांनी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
News - Bhandara




Petrol Price




