महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३१ मार्च महत्वाच्या घटना

१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

१८६७ : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

१८८९ : आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

१९०१ : पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

१९६४ : मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

१९६६ : रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

१९७० : १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

२००१ : सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

३१ मार्च जन्म

१५०४ : शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)

१५१९ : फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १५५९)

१५९६ : फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)

१८४३ : नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)

१८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८७)

१८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६०)

१९०२ : भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)

१९३४ : भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)

१९३८ : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.

१९७२ : ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.

१९७८ : भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.

१९८७ : भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म

१९५८ : भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर उमा पेम्माराजू यांचा जन्म (मृत्यू : ८ ऑगस्ट २०२२)

१९३९ : जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया याचा जन्म (मृत्यू : ३१ डिसेंबर १९९३)

१९२६ : भारतीय धर्मगुरू सुधींद्र तीर्थ याचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०१६)

१९१३ : व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचा जन्म (मृत्यू : २३ मार्च १९९१)

१८७२ : रशियन समीक्षक आणि निर्माते, बॅलेट्स रसेसचे संस्थापक सर्गेई डायघिलेव्ह यांचा जन्म (मृत्यू : १९ ऑगस्ट १९२९)

१८७१ : डेल इरेन देशाचे ३रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी आर्थर ग्रिफिथ यांचा जन्म (मृत्यू : १२ ऑगस्ट १९२२)

३१ मार्च मृत्यू

१९१३ : अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८३७)

१९७२ : अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९३२)

१९७८ : इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.(जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)

२००० : भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९०२)

२००२ : भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)

२००४ : अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)

२००४ : कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos