महत्वाच्या बातम्या

 एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा  :  महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्यावतीने प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृत लक्षित गटातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १० हजार रुपये व मुलाखतीच्या पुर्वतयारीसाठी ५ हजार रुपये इतके प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी अमृत लक्षित घटकातील ब्राम्हण, कायस्थ, मारवाडी, कोमटी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू, नेपाली, भूमिहार, लोहाणा, काणबी या गटाचा समावेश आहे. सन २०२५ - २६मध्ये महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा२०२५ उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

यासाठी इंच्छुकांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने २७ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्यापुर्वी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. अधिक माहितीसाठी अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अमृतच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos