नागपूरमध्ये रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ मार्च रोजी सकाळी ७:४४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे अपघात घडल्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कावरापेठ रेल्वे लाईनवर पोल क्रमांक ११२५/१० जवळ मृतावस्थेत आढळला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून, त्याचा रंग सावळा, बांधा मध्यम आणि उंची सुमारे ५ फूट आहे.
यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
News - Nagpur




Petrol Price




