भंडाऱ्यात मुलाने आईवर दगड फेकून हल्ला : वृद्ध महिला गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : वरठी येथील हनुमान वॉर्डमध्ये मुलाने आपल्या वृद्ध आईवर दगड फेकून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेतील आरोपी मुलाचे नाव गोपाल दतुजी बांते (४५, रा. हनुमान वॉर्ड, वरठी) असे असून, तो व त्याची आई एकाच परिसरात वेगवेगळ्या खोलीत राहतात.पोलिसांच्या माहितीनुसार, आईने अंघोड करण्याची साधी सूचना दिल्यामुळे संतापलेला गोपाल त्यावर रागावला आणि आपल्या आईवर दगड फेकून हल्ला केला.
याप्रकरणी पोलिसांनी गोपालविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




