महत्वाच्या बातम्या

 पिनाका रॉकेटची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी : नागपुरातील सोलर ग्रुपच्या प्रयत्नाने महत्त्वाचा टप्पा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सोलर इंडस्ट्री इंडिया समूहाने विकसित केलेल्या पिनाका एक्स्टेंडेड रेंज (ईआर) रॉकेटची राजस्थानमधील पोखरण येथे बुधवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नागपूरच्या सोलर ग्रुपने या चाचणीत एकूण २४ रॉकेट्सची अचूकता, प्रहारक्षमता आणि सातत्याची क्षमता तपासली. ही चाचणी ६ हजार कोटींच्या ऑर्डरच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली असून, ५० किमीपेक्षा अधिक मारक क्षमतेचे हे स्वदेशी रॉकेट सिस्टम भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आले आहे. सोलर इंडस्ट्रीजची उपकंपनी सोलर डिफेन्स अ‍ॅण्ड एअरोस्पेस लिमिटेड यांनी या रॉकेट्सची निर्मिती केली आहे. पिनाका ईआर प्रणाली एकावेळी १२ रॉकेट्स अवघ्या ४४ सेकंदांत डागू शकते, जे आधीच्या एमके-१ आवृत्तीच्या तुलनेत अधिक प्रगत आहे. एमके- १ ची रेंज सुमारे ४० किमी होती, तर पिनाका ईआर आवृत्ती ५० किमीपेक्षा अधिक अंतरावर मारा करू शकते.

ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला असून, आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ मिळणार आहे. सीमावर्ती भागातील जुन्या तोफखाना प्रणालींची जागा आधुनिक प्रणाली घेणार आहे.

सोलर ग्रुपने या प्रकल्पासाठी प्रोपेलंट्स आणि वॉरहेड्ससारख्या स्फोटक घटकांच्या निर्मितीत विशेष प्रावीण्य मिळवले असून, भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे





  Print






News - Nagpur




Related Photos