पालकमंत्री जनता दरबार तुमसर कार्यक्रमाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राज्यमंत्री गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनीकर्म तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा २२ मार्च, २०२६ रोजी तुमसर येथे उपस्थित राहणार आहे.त्या कार्यक्रमाची पाहणी आज जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केली.
यावेळी तहसीलदार उमेश अंबादे, गट विकास अधिकारी नंदकुमार वासेकर, उपकार्यकारी अभियंता महाजन, नायब तहसीलदार संजय जांभुळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. आगामी जिल्हास्तरीय जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी जनता दरबाराच्या तयारीचा आढावा घेतला. विविध विभागांना आवश्यक सूचना देऊन नागरिकांच्या समस्यांवर जलद कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.
या दरबारात जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित राहणार असून नागरिकांना त्यांच्या समस्या, अडचणी किंवा निवेदने थेट पालकमंत्री महोदयांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांसाठी आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले निवेदने लेखी स्वरूपात तयार करून या जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पालकमंत्री कार्यालयाने केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




