अहेरीत २० मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची कार्यकर्ता आढावा बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या वतीने अहेरी येथे २० मार्च रोजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सकाळी १० वाजता अहेरी येथे पार पडणार असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
ही बैठक आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली होणार आहे. बैठकीत अहेरी तालुक्यातील पक्ष संघटनाची स्थिती, कार्यकर्त्यांचे प्रश्न, आगामी राजकीय घडामोडी तसेच पक्ष बळकटीसाठी आवश्यक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीस अहेरी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, महिला आघाडी, राष्ट्रवादी युवती आघाडी, युवक पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बैठक अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे तालुका अध्यक्ष नागेश मडावी तसेच अहेरी शहराध्यक्ष व नगर पंचायत अहेरीचे उपाध्यक्ष शैलेश भाऊ पटवर्धन यांनी कळविले आहे. तसेच या बैठकीस फक्त अहेरी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी सूचना देण्यात आली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




