महत्वाच्या बातम्या

 गावागावात बैठका; वनहक्क व जमीन पट्ट्यांसाठी प्रयत्न : आ. धर्मराव बाबा आत्राम 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील सिरकोंडा, वेणालय, लक्ष्मीपूर, आसरअल्ली, सोमणपल्ली, पातागुडम आदी गावांमध्ये माजी मंत्री तथा आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून ग्रामस्तरावर बैठकींचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या बैठकींमध्ये गावकऱ्यांच्या विविध मूलभूत समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान गावकऱ्यांच्या वनहक्क पट्टे, खाबिलखास्त जमीन, आबादी पट्टे तसेच गावठाण पट्टे मिळण्यासंदर्भातील प्रश्नांवर विशेष भर देण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली गावा-गावातील पात्र नागरिकांना वनहक्क व इतर जमीनसंबंधित हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्षण काका येरावार यांनी म्हटले त्यावेळी शहराध्यक्ष रवी सुलतान हे होते, या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडत लवकरात लवकर त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos