कलादर्पण महोत्सवात प्रा. महेश सिलमवार यांचे उल्लेखनीय यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित कलादर्पण क्रीडा व कला महोत्सवात श्री सद्गुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथील प्रा. महेश सिलमवार यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. महोत्सवातील एकल व समूहगीत गायन स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा मान उंचावला.
या यशाबद्दल मंचावर उपस्थित क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे तसेच प्रमुख अतिथी डॉ. विवेक गोर्लावार, डॉ. नंदाजी सातपुते व डॉ. रुपेंद्रकुमार गौर यांच्या हस्ते प्रा. महेश सिलमवार यांना पदक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र माटे यांनी प्रा. महेश सिलमवार यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद डॉ. अपर्णा मारगोनवार, डॉ. पी. के. सिंग, डॉ. एम. पी. सिंग, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. सोनाली धवस, डॉ. दिपक नागापुरे, प्रा. सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. जया रोकडे, प्रा. कविंद्र साखरे, प्रा.राहुल आवारी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रवींद्र झाडे, सविता गारघाटे, अविनाश जिवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर, उषा माहूरपवार व पौर्णिमा गोहने यांनीही त्यांचे अभिनंदन केले. प्रा. महेशकुमार शामराव सिलमवार श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी.
News - Gadchiroli




Petrol Price




