आजचे दिनविशेष


१५ मार्च महत्वाच्या घटना
१४९३ : भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१५६४ : मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
१६८० : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
१८२० : मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.
१८२७ : टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
१८३१ : मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.
१८७७ : इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
१८९२ : लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.
१९०६ : रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.
१९१९ : हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
१९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
१९५६ : ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.
१९६१ : ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
१९८५ : symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.
१९९० : सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
२००१ : भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.
२०११ : सीरियन युद्ध सुरु झाले.
१९५० : नियोजन आयोगाची स्थापना
२०२५ : क्यानाडाचे 24 वे नवे पंतप्रधान म्हणून मार्क कार्णी यांनी घेतली शपथ
१५ मार्च जन्म
१७६७ : अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८४५)
१८६० : प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)
१८६६ : पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९१०)
१९०१ : पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९९)
१९७७ : भारतीय सैनिक - संदीप उन्नीकृष्णन (मृत्यू : २८ नोव्हेंबर २००८)
१९५३ : गिनी-बिसाऊ देशाचे अध्यक्ष बिसाऊ-गिनी सैनिक आणि राजकारणी - कुंबा इला (मृत्यू : ४ एप्रिल २०१४)
१९४३ : दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री - साहिबसिंह वर्मा (मृत्यू : ३० जून २००७)
१९३४ : भारतीय वकील आणि राजकारणी - कांशी राम (मृत्यू : ९ ऑक्टोबर २००६)
१९२९ : भारतीय संगीतकार - एस. आर. डी. वैद्यनाथन (मृत्यू : १८ नोव्हेंबर २०१३)
१८६५ : पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर - आनंदी गोपाळ जोशी (मृत्यू : २६ फेब्रुवारी १८८७)
१८३० : जर्मन लेखक, कवी आणि अनुवादक - नोबेल पुरस्कार - पॉल हेसे (मृत्यू : २ एप्रिल १९१४)
१८०९ : लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष - जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स (मृत्यू : २४ फेब्रुवारी १८७६)
१५ मार्च मृत्यू
४४ : ख्रिस्त पूर्व ४४: रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली.
१९३७ : रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९२)
१९९२ : हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.
२००० : विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.
२००२ : इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.
२००३ : मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
२०१३ : डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
२०१५ : भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)
१९८० : मेजर लीग बेसबॉलमधील पहिले आफ्रिकन अमेरिकन पंच - एम्मेट एशफोर्ड (जन्म: २३ नोव्हेंबर १९१४)
१९३३ : पेरू देशाचे ७३वे राष्ट्राध्यक्ष, कर्नल आणि राजकारणी - गुस्तावो जिमेनेझ (जन्म: ५ एप्रिल १८८६)
१७२१ : डेन्मार्क आणि नॉर्वे देशाच्या राणी - लुईस ऑफ मेक्लेनबर्ग-गुस्ट्रो (जन्म: २८ ऑगस्ट १६६७)
१६६० : डॉटर्स ऑफ चॅरिटीचे सह-संस्थापक - लुईस डी मारिलॅक (जन्म: १२ ऑगस्ट १५९१)
News - todayspecialdays




Petrol Price




