अफवेचा कहर पाणी मागणाऱ्या वृद्धेला मुले चोरणारी समजून जमावाकडून बेदम मारहाण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सोशल मीडियावरून वेगाने प्रसारित होणाऱ्या मुले पळवणाऱ्या टोळी च्या निराधार अफवांनी नागपुरात एका निष्पाप वृद्धेचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी भागात ही खळबळजनक घटना घडली. अफवेचा कहर पाणी मागणाऱ्या वृद्धेला मुले चोरणारी समजून जमावाकडून बेदम मारहाण सोशल मीडियावरून वेगाने प्रसारित होणाऱ्या मुले पळवणाऱ्या टोळीच्या निराधार अफवांनी नागपुरात एका निष्पाप वृद्धेचा बळी घेण्याचा प्रयत्न केला.
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी भागात ही खळबळजनक घटना घडली. केवळ पिण्यासाठी पाणी मागितले असता, भाषेच्या अडचणीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून एका ६० वर्षीय वृद्धेला जमावाने मुले चोरणारी समजून बेदम मारहाण केली. सुदैवाने, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतल्यामुळे या वृद्धेचे प्राण वाचले.
संबंधित वृद्ध महिला आपल्या नियमित उपचारांसाठी रुग्णालयात गेल्या होत्या. औषधे घेऊन घरी परतत असताना दुपारच्या सुमारास त्यांना प्रचंड थकवा जाणवला. औषध घेण्याची वेळ झाल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या आणि जवळच खेळणाऱ्या एका लहान मुलाकडे त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, या वृद्धेला मराठी किंवा हिंदी भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांनी आपल्या मातृभाषेत (भोजपुरी) संवाद साधला. हाच भाषेचा अडथळा त्यांच्यासाठी संकटाचे कारण ठरला.उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व सांगणारी विविध घोषवाक्ये देत शहरातून ग्रंथदिंडी काढली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच समाजात वाचन संस्कृती रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
News - Nagpur




Petrol Price




