महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /भंडारा : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय श्रमसंस्कार शिबिर द्वारा आयोजित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा चे विशेष संस्कार शिबिर ग्राम टाकळी येथे १२ ते १८ मार्च या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास शिबिराचा मुख्य शीर्षक असणार आहे.

याच औचित्याने १२ मार्च ला पहिल्या दिवशी स्वयंसेवकांची नोंदणी, शिबिरार्थी, स्वयंसेवक, गावकरी भेट व नियोजन तसेच शिबिराचे उद्घाटन आर.बी. गणवीर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा, विशेष अतिथी चंद्रकला भोपे उपाध्यक्ष नगरपरिषद भंडारा, रामविलास सारडा अध्यक्ष औद्योगिक संघटना भंडारा, आय. एम. सी.सदस्य अमित अनवेकर ,राकेश वाघाये एम.एम.पी.एल अधिकारी राहुल वाघाये, दक्ष प्रकल्प नियंत्रण समीतीचे खुशविंदर आर्या व विकास कोली, अध्यक्ष व्ही.एम.लाकडे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी एस. व्ही.साठवणे, संस्थेचे गटनिदेशक एम.एस.बदुकले, एस. डब्ल्यू.शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

स्वयंसेवकांच्या माध्यमातून श्रमसंस्कार, सामाजिक बांधिलकी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती करणे आणि समाजाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी करणे या उद्देशाने आपण हा शिबिर राबवित आहोत तर श्रमदानाच्या माध्यमातून टाकळी ग्रामवासीयांनी इलेक्ट्रिकल, वायरमन, टू व्हीलर दुरुस्ती, फ्रिज व एसी, लाकूड कामे  तसेच विविध तांत्रिक निशुल्क कामे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून करून घ्यावीत असे प्रतिपादन  उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले.

या सात दिवशीय होत असलेल्या शिबीराचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी एस.व्ही.साठवणे यांनी संपूर्ण शिबिराची रूपरेषा व दैनंदिनीच्या माध्यमातून  उपस्थितां समोर मांडली. उद्घाटनीय शिबिराचे सूत्रसंचालन ए.डी दिघोरे तर आभार सी. जी. चोपकर यांनी मानले. शिबिराच्या उद्घाटनाच्या यशस्वीतेसाठी आयटीआय मधील संपूर्ण निदेशक,शिल्प निदेशक आस्थापना कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.





  Print






News - Bhandara




Related Photos