महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री व प्रदर्शनाचे  आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटूंबाचे जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगाराचे साधान उपलब्ध व्हावे यासाठी स्वय सहायता गटांनी तयार केलेल्या उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा उद्देशाने जिल्हास्तरीय महिला बचत गटांचे वस्तु विक्री व प्रदर्शनी जिल्हा स्तरावर आयोजित करण्याचे नियोजन झालेले आहे.

त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री व प्रदशनी  दरम्यान स्वय सहायता गटांनी उत्पादीत केलेल्या मालाचे विक्री व प्रदर्शनी १० ते १४ मार्च २०२६ या कालावधीत दसरा मैदान, शास्त्री चौक, वरठी रोड भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे.

नागरिकांनी या  प्रदर्शनाला भेट  देवून बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची खरेदी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos