दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवक व युवतीकारीता ऑनलाईन वेबिनार संपन्न

- जिल्ह्यातील ८७ उमेदवा रांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवक व युवतीकारीता ऑनलाईन वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा आणि विघ्नहर्ता बहु. संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले.
सदर वेबिनार मध्ये शाश्वत दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री या विषयावर डॉ.विवेक दरवई, दुग्धव्यवसाय तज्ञ यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामधून प्रत्यक्ष दुग्धव्यवसाय करतांना करावयाचे नियोजन आणि आणि दुध उतपादनमध्ये वाढ यावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
तर डॉ. सुधाकर झळके सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये डॉ. झळके यांनी सदर कार्यक्रमा संदर्भात भूमिका स्पष्ट केली. आणि पंकज भुते, प्राचार्य, मायनिंग खा.औ. प्र. संस्था, तुमसर प्रमुख पाहुणे असून यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदर वेबिनार मध्ये जिल्यातील ८७ उमेदवरांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे संचलन आणि आभार प्रदर्शन शफीउल्ला सय्यद, यांनी केले.
News - Bhandara




Petrol Price




