महत्वाच्या बातम्या

 पिडित बालिकेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, मौजा वेळाबाई, ता. वणी जि. यवततमाळ येथे पटना १३ जानेवारी २०१७ सायंकाळी रोजी ०८:३० ने सुमारास पिडिता हि तिच्या मैत्रीणीसह २६ जानेवारी ला सांस्कृक्तिक कार्यक्रम असल्याने डांस ची प्रक्टिस करून घरी परत येत असताना गावातील आरोपी महेश मारोती चवले वय २८ वर्षे रा. वेळाबाई याने तिचा हात पकडून सोबत चल महणून ओढत फरफटत गावाशेजारी भोंगळे याच्या शेतात नेले व पिडितेला दोरीन हात बांधून रूमाल तोंडात कोंबुन बाभळीच्या झाडाखाली जबरदस्तीने कपडे काढून पिडितेच्या इच्छेविरुध्द दोन तिनदा बलात्कार केला व कोणाला सांगितले तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली व आरोपी पहाटे पळुन गेला. 

पिडितेने कसेबसे हात सोडून घरी आली व घटनेची माहिती आईवडिलांना दिली व सदर घटनेचा रिपार्ट पो.स्टे. शिरपूर येथे आरोपी विरूध्द भादवि चे कलम ३५४, ३५४ (डि), ३४२, ३७६. ३७६ (२) (एन), ५०६ सहकलम ४ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ तसेच सहलकल ३(१)(w)(i), ३(१) (w)(ii), ३(२)(V), ३(२) (Va), अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ तरतूदी नुसार गुन्ह्याची नोंद अपराध क. ०५/२०१७ अन्वये नोंद करण्यात आली व तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने वणी यांनी केला. तपासामध्ये आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने विशेष न्यायालय केळापूर येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

अभियोग पश्वाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमेश डी. मोरे यांनी एकूण १२ महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. वि. विशेष सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी, पिडिता, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी व इतर परिस्थितीजन्य पुराव्यानिशी अभियोग पश्वाची बाजू ग्राह्य धरून आरोपी यास भांदवि चे कलम ३४२ ३७६ (२) (एन), ५०६ सहकलम ४ बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ तसेच सहलकल ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii) ३(२)(V), ३(२) (Va), अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मध्ये शिक्षा ठोठावण्यात आली. 

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ४ मध्ये २० वर्षे व रू. १०,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास तसेच भांदवी ३४२ भांदवी मध्ये ६ महिने सश्रम कारावास व ५००/- रू. दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाचे अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भांदवि चे कलम ३५४ भांदवी मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व ५०००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भांदवि ३५४ (डि) मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व २०००/-रू. दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाचे अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भांदवि ५०६ भांदवि मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू. दंड व दंड न भरल्यास ८ दिवसाचे अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच सहलकल ३(१)(w)(i) अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ३(१)(w)(ii) मध्ये अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भांदवि चे कलम ३५४ भांदवी च्या अनुषंगाने ३(२)(Va) अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व ३०००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भांदवि चे कलम ३७६ भांदवी च्या अनुषंगाने ३(२)  (vee a), अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मध्ये १० वर्ष सश्रम कारावास व ५०००/-रू. दंड व दंड न भरल्यास ६ महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. कलम ३७६ भादवि मधील शिक्षेचा समावेश बालकांचे लैंगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ मध्ये असून, कलम ४२ प्रमाणे भांदवी चे कलम ३७६ (२) (एन) मध्ये वेगळी शिक्षा देण्यात आली नाही. 

सर्व शिक्षा एकत्रित रित्या भोगावयाचे आहे. एकुण दंडाची रक्कम रू. २८ हजार ५०० हि पिडितेला देण्याचा आदेश पारीत झाला. सदरहू शिक्षा (अतिरिक्त सत्र) न्यायाधिश केळापूर अभिजीत एम. देशमुख साहेब यांचे न्यायालयाने ०४ मार्च २०२६ रोजी ठोठावली, आरोपी करिता अडें. चौधरी यांनी बाजू मांडली. पैरवि अधिकारी पो.ना. सुरेश निब्रड ब.नं. ३२२ पो.स्टे. शिरपुर यांनी काम पाहिले.





  Print






News - World




Related Photos