शेतकऱ्याचा मोटारपंप तपासत असताना करंट लागून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सुरबन बोंडगाव येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता एक दुर्दैवी घटना घडली. जयगोपाल देवराम पुराम (४३) हे घराजवळील बोअरवेलवरील मोटारपंप पाणी उचलत नसल्याने त्याची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा डावा अंगठा विद्युत तारेला लागल्याने त्यांना जोराचा करंट लागला आणि ते बेशुद्ध पडले.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, केलोरी येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती हिरालाल सीताराम उईके यांनी केशोरी पोलिसांना दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलमान्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार प्रेमदास होली करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




