कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नरखेड तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्नीत ५८ सेवा, विविध कार्यकारी संस्थेमार्फत तसेच थेट बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या सर्व सभासदांनी वैयक्तिक माहिती त्वरीत बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावे व तालुका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नरखेडचे सहाय्यक निबंधक सतिश जासुदकर यांनी केले आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ नूसार राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतक-यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून शेतक-यांची थकित कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्याचे उददेशाने राज्य स्तरावर उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने थकित कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन अहवाल शासनास सादर करावयाचा आहे.
त्यास अनुसरुन, नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नागपुरच्या माध्यमातून केलेल्या शेती कर्जाची मुदतीत परतफेड करु शकले नाहीत, असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे उपरोक्त शासन निर्णयातील सुचनेनुसार वरील थकित शेतकऱ्याची कागदपत्र संकलित करण्याचे कामकाज नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखेकडून शाखा स्तरावर सुरु आहे.
शेतकऱ्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती जसे अद्यावत आधार कार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, अॅग्री स्टॅक फार्मर आय.डी., कर्ज खाते पास बुक आणि सेव्हींग पास बुकची झेरॉक्स त्वरीत बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. नरखेड जि. नागपुर पत्ता- प्रशासकीय इमारत, पहिला माळा, नरखेड यांचे कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावे व तालुका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Nagpur




Petrol Price




