महत्वाच्या बातम्या

 तुमसर येथे १७ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या


- सीतासावंगी न्यू कॉलनीतील घटना; इयत्ता ११ वीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील सीतासावंगी येथील न्यू कॉलनी परिसरात गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मानवता संजय चौरे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून भरदुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मानवता ही तुमसर येथील यूएसए विद्यालयाची इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी होती. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास तिचे आई-वडील घराच्या हॉलमध्ये बसले होते. त्याचवेळी मानवताने मधल्या खोलीचे दार आतून बंद करून गळफास घेत जीवन संपविले.

काही वेळाने खोलीचे दार उघडले जात नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ही घटना उघडकीस येताच चौरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपास व शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तिने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos