शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान खरेदीची १०२.०३ कोटी रक्कम जमा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : धान खरेदीदार संस्थांकडून खरीप पणन हंगाम २०२५-२०२६ मध्ये आधारभूत किमत खरेदी योजने अंतर्गत भंडारा जिल्हयामध्ये शेतकऱ्यांकडुन धान खरेदी करण्यात आलेली आहे. या धानाचे शेतकरी चुकार ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी ४४५.९८ कोटी प्राप्त झालेले असुन जिल्हा पणन अधिकारी, भंडारा मार्फत शेतकरी चुकारे रक्कम अदा करण्याचे कार्यवाही सुरु असून ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यंत १०२.०३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरीत शेतकरी चूकार दोन दिवसात अदा करण्यात येईल, अशी माहिती एस. एस. पाटील, जिल्हा पणन अधिकारी भंडारा यानी दिली आहे.
News - Bhandara




Petrol Price




