वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेतील मोठा सुधारणा : ३०० सीट्सची वाढ, नवीन कोच जोडले जाणार


- प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, भारतीय रेल्वेने विविध मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसला कोचांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नव दिल्ली : देशभरातील वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेला अपार प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती मागणी पाहता, भारतीय रेल्वेने या अत्याधुनिक ट्रेनच्या सेवेची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशभरात सुमारे १६० वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू असून, या ट्रेन्सच्या लोकप्रियतेत दररोज वाढ होत आहे.
प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद पाहता, रेल्वे प्रशासनाने नागपूर-इंदोर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आठ कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या ट्रेनला आठ कोच आहेत, पण अनेक वेळा आसनांची उपलब्धता नसल्यामुळे प्रवाशांना वेटिंग लिस्टवर राहावे लागते. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत भारतीय रेल्वे बोर्डाने अखेर या ट्रेनला आणखी आठ कोच जोडण्यास मान्यता दिली आहे.
तसेच, सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत मार्गावर सुद्धा अधिक ३०० सीट्स वाढविण्यासाठी चार अतिरिक्त वातानुकूलित चेअर कार कोच जोडले जाणार आहेत. यामुळे या वंदे भारत ट्रेनमध्ये कोचांची संख्या १६ वरून २० होईल, आणि सीट्सची संख्या सुमारे ३०० ने वाढेल.
प्रमुख बदल -
१. नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेस – आठ कोचांमध्ये आणखी आठ कोच जोडले जातील, आसन क्षमता वाढवली जाईल.
२. सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस – चार अतिरिक्त वातानुकूलित चेअर कार कोच जोडले जातील, कोचांची संख्या १६ वरून २० होईल.
३. तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस – ४ कोच कायमस्वरुपी जोडले जातील.
या वाढीमुळे वंदे भारत एक्सप्रेस अधिक प्रवाशांना सेवा पुरविण्यास सक्षम होईल आणि रेल्वे प्रवासाची सुविधा आणखी सुधारेल. सिकंदराबाद-तिरुपती मार्गावर ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल.
मंगळवारी या गाडीची सेवा बंद असते.ट्रेन सकाळी ६ वाजता सिकंदराबादहून सुटते, आणि तिरुपतीहून परतीचा प्रवास दुपारी ३:१५ वाजता सुरू होऊन, रात्री ११:४० वाजता सिकंदराबादला पोहोचते.
वाढती मागणी लक्षात घेत, भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्ताराने प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवास अनुभव मिळणार आहे.
News - World




Petrol Price




