महत्वाच्या बातम्या

 माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त


- अभियानादरम्यान ०२ अग्निशस्त्रे, ३१ नग जिवंत काडतूसांसह विविध माओवादी साहित्य घटनास्थळावरुन करण्यात आले हस्तगत 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, जिल्ह्यातील नागरीक आता माओवादाच्या दहशतीतून मुक्त झाले आहेत. भुतकाळात सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हेे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलातील जवानांना यश आले आहे. 

सविस्तर वृत्त असे आहे की, माओवाद्यांनी पोस्टे गर्देवाडा हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात स्फोटक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिती येथील ०५ तुकड्या, बिडीडीएसचे ०२ पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते.

सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून शोध अभियान राबवून बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता सदर ठिकाणावरुन १) ०१ नग १२ बोर रायफल , ०२) ०१ नग एअर गन रायफल ०३) १३ नग .303 जिवंत काडतूस ०४) १८ नग ८ एम. एम. जिवंत काडतूस, ०५) ०३ नग ग्रेनेड, ०६) १८ नग बिजीएल सेल, ०७) ०२ नग बिजीएल लाँचर, ०८) १० नग डेटोनेटर, ०९) २१ नग सुराका सेल, १०) ०१ नग होंडा कंपनीचे इलेक्ट्रीक जनरेटर, ११) २२ नग वायर बंडल व मोठ¬ा प्रमाणावर इतर माओवादी साहित्य विशेष अभियान पथक व बिडीडीएस पथकांव्दारे घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनिल उईके यांच्या देखरेखी खाली विशेष अभियान पथक, गडचिरोली, प्राणहिता व इंट सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे





  Print






Related Photos