महत्वाच्या बातम्या

 शेती कामासाठी १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोदकामावरील निर्बंध शिथील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल स्त्रोतांचे संरक्षण करणे तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्ध सुनिश्ति करण्यासाठी जिल्ह्यात बोअरवेल खोदकामावर निर्बंध लागू करण्यात आले होते. शेतीकामासाठी १५ डिसेंबर पर्यंत बोअरवेल खोदकामावरील निर्बंध शिथील करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे, पिकांचे  संवर्धन, सिंचनाची आवश्यकता तसेच अन्य कृषि विषयक कामांची निकड विचारात घेता जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी नवीन बोअरवेल खोदकामास यापूर्वीच्या आदेशान्वये घालण्यात आलेले निर्बंध १५ डिसेंबर पर्यंत शिथील केले आहे.

सदर कालावधीत केवळ शेतीविषयक कामांसाठी बोअरवेल खोदकाम करता येणार असून कुठल्याही विशेष परवाणगीची आवश्यकता राहणार नाही. ही सवलत केवळ शेती विषयक कामांसाठीच लागू राहणार असून घरगुती व्यावसायिक, औद्योगिक, बांधकाम किंवा अन्य कोणत्याही बिगरशेती कारणांसाठी बोअरवेल खोदकामावरील यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे निर्बंध राहणार आहे. तसेच लागू असलेल्या इतर वैधानिक तरतुदी, नियम व अटीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.





  Print






Related Photos