महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


११ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१९२६ : अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

१९३० : आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

१९४२ : दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

१९४७ : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

१९६२ : कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.

१९७५ : अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९८१ : अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

२००४ : यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

११ नोव्हेंबर जन्म

१८२१ : रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)

१८५१ : विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू:४ जानेवारी १९०८ – मुंबई)

१८७२ : किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९३७)

१८८६ : लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)

१८८८: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८२)

१८८८ : स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)

१९०४ : भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)

१९११ : लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९९१)

१९२४ : कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९९६)

१९२६ : विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००३)

१९३६ : मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

१९३६ : हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.

१९४२ : वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)

१९६२ : अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.

१९८५ : भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

१६३३ : इंग्रजी राजकारणी, कौन्सिलचे लॉर्ड अध्यक्ष जॉर्ज सॅव्हिले यांचा जन्म (मृत्यू : ५ एप्रिल १६९५)

११५५ : कॅस्टिल आणि टोलेडोचे राजा अल्फोन्सो आठवा यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑक्टोबर १२१४)

१०५०: पवित्र रोमन सम्राट हेन्री IV यांचा जन्म (मृत्यू `: ७ ऑगस्ट ११०६)

११ नोव्हेंबर मृत्यू

१९८४ : मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९९)

१९९४ : ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९०४)

१९९: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.

१९९९ : शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.

२००४ : नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)

२००५ : ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)

२००५ : नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.

२०२२ : भारतीय अभिनेते सिद्धान्त वीर सुर्यवंशी यांचे निधन (जन्म: १५ डिसेंबर १९७५)

१९७३ : फिन्निश रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते अर्तुरी इल्मारी विर्तनें यांचे निधन (जन्म: १५ जानेवारी १८९५)





  Print






Related Photos