महत्वाच्या बातम्या

 विहिरीत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू


- पाणी काढताना तोल गेल्याने दुर्घटना; तळोदी परिसरात हळहळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना अचानक तोल गेल्याने विहिरीच्या पाण्यात पडून एका ६५ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी तळोदी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निर्मला वसंतराव कुंमरे ६५ वर्षे रा. तळोदी असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला कुंमरे या आपल्या शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यामुळे त्या थेट विहिरीतील पाण्यात पडल्या.

विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती संबंधितांना देण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती गिरड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी गिरड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अचानक घडलेल्या या दुर्घटनेत निर्मला कुंमरे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तळोदी परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos