महत्वाच्या बातम्या

 सरदार पटेल प्राथमिक शाळेत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सरदार पटेल प्राथमिक शाळा, नगर परिषद बल्लारपूर येथे शनिवार, ८ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, तसेच वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन व पर्यावरण विषयावर भाषणे केली. त्यानंतर विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणासंदर्भातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रितपणे शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पेंदाम तसेच सहायक शिक्षक प्रवीण मछिरके आणि सहायक शिक्षिका शीतल विश्वकर्मा, सीमा ताजणे, हसीना खान व छाया केसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.





  Print






News - Chandrapur




Related Photos