महात्मा फुले महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महात्मा फुले विकास महामंडळाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील लाभार्थ्यांसाठी ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याला ५० टक्के अनुदान योजनेंतर्गत १० लाभार्थी, बिज भांडवल योजनेंतर्गत १० लाभार्थी व थेट कर्ज योजनेंतर्गत २५ लाभार्थी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. तसेच सदर योजना खाटिक समाजातील लाभार्थ्यांसाठी हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत आहे. योजनांची अधिक माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा फुले विकास महामंडळाच्या सामाजिक न्याय भवन येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महामंडळाच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




