निवृत्तीवेतनधारकांसाठी शंकानिरसन मेळावा ६ ऑगस्ट रोजी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी शंकानिरसन मेळाव्याचे आयोजन ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाजकल्याण कार्यालय परिसर, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्यात निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध बाबी, प्रक्रिया तसेच उद्भवणाऱ्या शंका व अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




