आरोग्य शिबिरात पालकमंत्र्यांनी केली रक्तदाब व डोळ्यांची तपासणी

- शिबिरात नागरिकांची उसळली गर्दी
- तिनही दिवस लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत वर्धा येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी तिनही दिवस या शिबिराला भेट देऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याची खात्री केली. आज त्यांनी स्वत: रक्तदाब व डोळ्यांची तपासणी केली तसेच शिबिरात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी माजी खासदार रामदास तडस व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात आरोग्य अमृत महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत जिल्ह्यात वर्धा, तळेगाव, हिंगणघाट व देवळी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले शिबिर २२ ते २४ जुलै दरम्यान बच्छराज धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात पहिल्या दिवसापासून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
रुग्ण तपासणीसाठी शिबिरात एकून २२ दालने लावण्यात आली होती. या दालनांमधून ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात आली. याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २२ जुलै रोजी उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी शिबिराच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही व्यक्तीश: शिबिरांना वेळोवेळी भेट देऊन तेथे येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी, वेगवेगळ्या प्रकारच्या निदान चाचण्या, औषधे वितरणाचा आढावा घेतला. तसेच आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. काही गंभीर, दुर्धर आजाराच्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या पुढील उपचाराकरीता नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले.
हिंगणघाट व तळेगाव येथे ८ व ९ ऑगस्टला शिबिर -
आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत पुढील महाआरोग्य शिबिर आष्टी तालुक्यातील तळेगाव (शा.) व हिंगणघाट येथे एकाचवेळी आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ८ व ९ ऑगस्ट असे दोन दिवस दोन्ही ठिकाणी शिबिर पार पडणार आहे. या शिबिरांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




