महत्वाच्या बातम्या

 चिंचाळा येथे आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लाकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, जि.प.आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र ताडाली अंतर्गत आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, गटविकास अधिकारी संगिता भांगरे, चिंचाळा ग्रामपंचायत प्रशासक शोभा चिमुरकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेंडे,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित जयस्वाल, समुदाय आरोग्य अधिकारी स्नेहल वासेकर उपस्थित होते.

या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामुळे चिंचाळाच्या जवळपास दहा गावातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. कार्यक्रमाचे संचालन पंकज उद्धारवार यांनी तर आभार स्नेहन वासेकर यांनी मानले.

कार्यक्रमाला आरोग्य सेविका हिमकांता खोब्रागडे, आरोग्य सेवक उमाकांत रायपुरे, लीला पिंपळशेंडे, सुनिता कोलते, पूजा पिंपळशेंडे, साधना सवईकर, छबू ठमके, सोनी खरबनकर यांच्यासह चिंचाळा गावातील नागरिक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos