विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार नवी दिशा : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय नाट्य कार्यशाळेचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद विद्यालय, गडचिरोली येथे नाटक एके नाटक या सात दिवसीय नाट्य कार्यशाळेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषा अशा नाट्यकलेच्या विविध अंगांचे प्रशिक्षण नामांकित नाट्यतज्ज्ञांकडून या कार्यशाळेत दिले जाणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी आमदार डॉ. नरोटे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, गडचिरोलीमध्ये उभारल्या जाणाऱ्या नाट्यगृहाच्या रंगमंचावर आपल्या जिल्ह्यातील कलाकारांनीच दमदार अभिनय करावा, हीच या कार्यशाळेमागील प्रेरणा आहे. या प्रशिक्षणातून उद्याचे उत्कृष्ट कलाकार घडतील आणि राज्याच्या सांस्कृतिक विश्वात गडचिरोलीची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे संस्थापक सतीशजी चिचघरे, झाडीपट्टी नाट्यभूमीचे सुनीलजी चडगुलवार, प्राचार्य यामिनी चडगुलवार तसेच नाट्य प्रशिक्षक अजिंक्यजी थेर व त्यांचा चमू उपस्थित होता.
News - Gadchiroli




Petrol Price




