रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी : धादरी/उमरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तिरोडा तालुक्यातील धादरी/उमरी परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना २० जुलै रोजी घडली. शेतात काम करीत असताना अचानक आलेल्या रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण आबाजी कापसे रा. धादरी/उमरी हे नेहमीप्रमाणे शेतातील काम करीत होते. यावेळी अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी तिरोडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या घटनेनंतर धादरी/उमरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शेतात काम करताना शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असून, वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
News - Gondia




Petrol Price




