मधमाशी पालनातून रोजगाराची संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) राज्यात राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि मधमाशी संरक्षण व संवर्धनाला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य खरेदीसाठी ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुकीची सुविधा देण्यात येणार आहे. शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षण आणि मधमाशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
योजनेत वैयक्तिक मधपाळ, केंद्रचालक प्रगतशील मधपाळ आणि केंद्रचालक संस्था या घटकांचा समावेश आहे.वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार साक्षर असणे व १८ वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. प्रगतशील मधपाळासाठी किमान दहावी उत्तीर्ण व २१ वर्षांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, बसस्थानकासमोर, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
News - Chandrapur




Petrol Price




