महत्वाच्या बातम्या

 आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे प्रयत्नाने 35 वर्षाअखेर गोटूल भूमी जागे चा प्रश्न मार्गी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील चांदाळा रोडवरील आदिवासी गोटूल भूमी जागेचा तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न गोटूल समितीच्या नवीन कार्यकारिणीने आमदार डॉ मिलिंद नरोटे यांचे मार्फत वन हक्क समिती, वनविभाग, नगरपरिषद जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ०१ हेक्टर जागा सदर आदिवासी गोटुल भूमीसाठी मंजूर करून घेतली. 

वनविभाग १००  बाय १०० मीटर जागेचे सीमांकन करून दिले त्या ठिकाणी खांब उभारून सीमा निश्चितीकरणाचा कार्यक्रम गोटूल भूमी चे कार्याध्यक्ष तथा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली व शुभ असते हस्ते उत्साहात पार पडले.

गोटूल भवनाच्या जागेवरील काम वनविभागाशी संबंधित प्रक्रियेमुळे अनेक वर्षे रखडले होते. मात्र आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून हा प्रश्न निकाली काढण्यात यश आले. त्यामुळे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असलेल्या या गोटूल भूमीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या सोहळ्यास गडचिरोली नगर परिषद सभापती हर्षल गेडाम, आदिवासी गोटूल समितीचे अध्यक्ष नंदुभाऊ नरोटे, कोषाध्यक्ष अमरसिंग गेडाम, सचिव देवराव अलाम सर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतीरकर काँग्रेस आदिवासी जिल्हाध्यक्ष माधव गावळ, एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा सचिव सदानंद ताराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे, आनंद कंगाले, उमेश उईके, आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, बादल मडावी, सुमित कुमरे, विलास नरोटे, श्याम गावडे, दिनेश कुमरे, काँग्रेस नेते पंकज गुड्डेवार, रजनीकांत मोटघरे तसेच विविध सामाजिक, राजकीय व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोटूल ही आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख आणि परंपरेचे केंद्र असल्याचे सांगत, या भूमीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. अनेक दशकांच्या संघर्षानंतर गोटूल भूमीचा प्रश्न निकाली निघाल्याने आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण असून, भविष्यात या ठिकाणी भव्य गोटूल भवन उभारून सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आदिवासी समाजाच्या दृष्टीने हा केवळ सीमांकनांचा कार्यक्रम नसून ३५ वर्षांच्या संघर्षाचा विजय, आदिवासी अस्मितेचा सन्मान आणि गोटूल संस्कृतीच्या जतनासाठीचा ऐतिहासिक टप्पा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos