महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


११ जुलै महत्वाच्या घटना

१६५९ : अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.Government

१८०१ : फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.

१८९३ : कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.

१९०८ : लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली. 

१९१९ : नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.

१९३० : ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.

१९५० : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.

१९५५ : अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले. 

१९७१ : चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९७९ : अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

१९९४ : पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

२००१ : आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.

२००६ : मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.

१९८९ : जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.Holidays & Seasonal Events

२०२१ : रिचर्ड ब्रॅन्सन - हे त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानाद्वारे अंतराळात जाणारे पहिले सामान्य नागरिक बनले.

१९७८ : लॉस अल्फाक आपत्ती - घातक द्रव वायू वाहून नेणारा ट्रकच्या अपघातामुळे स्पेन मधील २१६ पर्यटकांचे निधन.

१९७७ : मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर - यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले.

१९७३ : व्हेरिग फ्लाइट ८२० च्या अपघातात १२३ लोकांचे निधन, त्यामुळे विमानाच्या शौचालयात धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली.

१९६२ : पहिले ट्रान्सअटलांटिक उपग्रह दूरदर्शन प्रसारण झाले.

१९६२ : प्रोजेक्ट अपोलो - नासाने चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्याचे आणि त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची घोषणा केली.

१९४३ : दुसरे महायुद्ध - सिसिलीवर मित्र राष्ट्रांचे आक्रमण.

१९४० : दुसरे महायुद्ध - विची फ्रान्स राजवट औपचारिकपणे स्थापन झाली.

१९२१ : मंगोलियन पीपल्स रिपब्लिक - स्थापना.

११ जुलै जन्म

१८८९ : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा)

१८९१ : प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १९६१)Time & Calendars

१९२१ : दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

१९३४ : जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक जियोर्जियो अरमानी यांचा जन्म.

१९५३ : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.

१९५६ : भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक अमिताव घोष यांचा जन्म.

१९६७ : भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक झुम्पा लाहिरी यांचा जन्म.

१९२७ : लेसरचे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचा जन्म (मृत्यू : ५ मे २००७)

१९२३ : भारतीय अभिनेत्री आणि कॉमेडियन तुन तुन यांचा जन्म (मृत्यू : २४ नोव्हेंबर २००३)

१७६७ : अमेरिका देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष जॉन क्विन्सी ऍडम्स यांचा जन्म (मृत्यू : २३ फेब्रुवारी १८४८)Birthdays & Name Days

११ जुलै मृत्यू

१९८९ : ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचे निधन. (जन्म: २२ मे १९०७)

१९९४ : परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन.

२००३ : कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

२००९ : गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)

२०२२ : भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट जोसेफ मिट्टाथनी यांचे निधन (जन्म: १२ जुलै १९३१)

२०२२ : भारतीय अभिनेते के. रामराज यांचे निधन

२०२२ : भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते के. एन. ससीधरन यांचे निधनHolidays & Seasonal Events

१९५७ : इस्लामच्या निझारी इस्माइली पंथाचे ४८वे इमाम आगा खान (तिसरा) यांचे निधन (जन्म: २ नोव्हेंबर १८७७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos