महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३० जून महत्वाच्या घटना

१८५९ : चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.

१९३७ : जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.

१९४४ : मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.

१९६० : काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले

१९६५ : भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९६६ : कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले.

१९६६ : अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.

१९७१ : सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

१९७८ : अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

१९८६ : केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

१९९७ : ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

२००२ : ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

२०२२ : एकनाथ शिंदे - यांनी महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

२०१९ : डोनाल्ड ट्रम्प - उत्तर कोरिया देशालाभेट देणारे हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले.

१९९० : पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीने अर्थव्यवस्थांचे विलीनीकरण केले.

१९७७ : सीएटो, साऊथईस्ट आशिया ट्रीटी ऑरगॅनिझशन (SEATO) - संघटना बरखास्त झाली.

१९४४ : दुसरे महायुद्ध - चेरबर्गची लढाई: संपली.

३० जून जन्म

१४७० : फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)

१९१९ : हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)

१९२८ : कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)

१९३४ : भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.

१९४३ : दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.

१९५४ : डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.

१९५९ : भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.

१९६६ : अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.

१९६९ : श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म.

१९७३ : भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.

१९७० : भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार विनायक मेटे यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑगस्ट २०२२)

१९५८ : भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार अरविंद गिरी यांचा जन्म (मृत्यू : ६ सप्टेंबर २०२२)

१९४५ : भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म

१९४५ : भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ता - पद्मश्री, जमनालाल पुरस्कार विजेते संजीत बंकर रॉय यांचा जन्म

१९२६ : अमेरिकन बायोकेमिस्ट - नोबेल पारितोषिक विजेते पॉल बर्ग यांचा जन्म (मृत्यू : १५ फेब्रुवारी २०२३)

१९१८ : भारतीय हिंदी कवी नागार्जुन यांचा जन्म (मृत्यू : ५ नोव्हेंबर १९९८)

१९११ : पोलिश-जन्म अमेरिकन कादंबरीकार, निबंधकार आणि कवी - नोबेल पुरस्कार विजेते झेस्लॉ मिलोझ यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑगस्ट २००४)

३० जून मृत्यू

१९१७ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)

१९१९ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.

१९९२ : साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.

१९९४ : नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)

१९९७ : शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.

१९९९ : मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन.

२००७ : दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)

२०२१ : भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १९७०)

१९७४ : अमेरिकन नागरी हक्क संघटक, मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर) यांची आई अल्बर्टा विल्यम्स किंग यांचे निधन (जन्म: १३ सप्टेंबर १९०४)

१९६१ : अमेरिकन अभियंते आणि शैक्षणिक, ऑडियन ट्यूबचे संशोधक ली डी फॉरेस्ट यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १८७३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos