माजरी कॉलरीत बसपाची आढावा बैठक संपन्न; बूथ संघटन मजबूत करण्यावर भर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधि / चंद्रपूर : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील माजरी कॉलरी येथे २७ जून रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पक्ष संघटन बळकट करणे, प्रत्येक बूथवर संघटन उभारणे आणि आगामी राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. मोहन रायकवार, प्रदेश प्रभारी तथा विदर्भ झोन प्रभारी महेंद्र मकेश्वर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रत्नाकर शाठे, बीव्हीएफ जिल्हा संयोजक सुधीर भारती, वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष हरिऔध भारती यांच्यासह माजरी कॉलरी परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या बसपा प्रमुख मायावती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यभर सुरू असलेल्या संघटन विस्तार अभियानाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक बूथवर सक्षम संघटन उभारून पक्ष अधिक मजबूत करण्याचा संकल्प डॉ. मोहन रायकवार यांनी व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पक्षाची विचारधारा पोहोचवून जनसंपर्क वाढवावा, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस आर. डी. गेडाम, विरेंद्र गौतम, ओमप्रकाश वासनिक, अनिल कुमार, श्यामलाल वर्मा, रामभजन तसेच बीव्हीएफचे आनंद वर्मा, दिनेश प्रसाद, ओमनाथ राम, विजय पाटील आणि वकील राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विधानसभा अध्यक्ष हरिऔध भारती यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.
News - Chandrapur




Petrol Price




