महत्वाच्या बातम्या

 बियाणांच्या उत्तम उगवणी करिता बीज प्रक्रिया महत्वाची


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : नुकताच साखरा साकोली येथे पीएम किसान २३ व्या हप्त्याच्या कार्यक्रमा निमित्त कृषी विज्ञान केंद्र, व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. उषा रा. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली धान बियाण्यांची बीज प्रक्रिया याविषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा तर प्रमुख पाहुणे म्हणून बी एस सपाटे  उप कृषी अधिकारी, उपस्थित होते. 

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून. वाय आर  महल्ले कृषी अभियांत्रिकी, डॉ. पी एस उंबरकर किटकशास्त्र,  के डी तायडे, उद्यानविद्या, के एस गायकवाड ,पी.ए.कम्प्युटर उपस्थित होते. साखरा व  आसपासच्या गावातील शेतकरी, महिला आणि युवा यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

सर्वप्रथम कार्यक्रमाची प्रास्तावना संगीता माने यांनी केली. त्यामध्ये त्यांनी पावसाच्या अंदाजानुसार कमी कालावधी असणारे धान पिकाची लागवड करावी असे सांगितले. यानंतर तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. पी एस उंबरकर किटकशास्त्र  यांनी धान बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक  करून दाखविले. पेरणीवेळी त्या बियानांना जैविक निविष्ठांची बीज प्रक्रिया करावी असेही त्यावेळी त्यांनी सांगितले.

वाय आर  महल्ले यांनी पेरिव धान पद्धतीवर तर के डी तायडे यांनी फळ पिकांवर मार्गदर्शन केले. के एस गायकवाड यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याच्या वितरणाचा थेट प्रक्षेपण दाखवले. तर बी एस सपाटे यांनी कृषी विभागाच्या सलग्न नियोजनाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन एस एम नंदागवळी, सहाय्यक कृषी अधिकारी, साकोली तर आभार प्रदर्शन आर पी पवार यांनी केले.          





  Print






News - Bhandara




Related Photos