महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१९ जून महत्वाच्या घटना

१६७६ : शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

१८६२ : अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.

१८६५ : अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

१९१२ : अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

१९४९ : चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

१९६१ : कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९६६ : शिवसेनेची स्थापना.

१९७७ : ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

१९७८ : ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

१९७८ : गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

१९८१ : भारताच्या अॅपल उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९८९ : ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९९९ : मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

२०१८ : अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.

२००७ : अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात - बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.

१९१० : जागतिक वडील दिन - पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.

१९ जून जन्म

१५९५ : सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १६४४)

१६२३ : फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)

१७६४ : उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म.

१८७७ : पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.

१९४१ : चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.

१९४५ : म्यानमारची राजकारणी ऑँगसान सू की यांचा जन्म.

१९४७ : ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म.

१९७० : भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.

१९७६ : फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.

१९६४ : युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा जन्म

१९६२ : भारतीय अभिनते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आशिष विद्यार्थी यांचा जन्म

१९५५ : अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी अयमान अल-जवाहिरी यांचा जन्म (मृत्यू : ३१ जुलै २०२२)

१९३३ : सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती व्हिक्टर पटसायेव यांचा जन्म (मृत्यू : २९ जून १९७१)

१९०६ : जर्मन-आयरिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार अर्न्स्ट बोरिस चेन यांचा जन्म (मृत्यू : १२ ऑगस्ट १९७९)

१९ जून मृत्यू

१७४७ : पर्शियाचा सम्राट नादिर शहा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)

१८७७ : शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.

१९३२ : मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.

१९४९ : भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)

१९५६ : अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)

१९९३ : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९११)

१९९६ : समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचे निधन.

१९९८ : प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)

२००० : मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.

२००८ : बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९३४)

२०२० : भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शाह यांचे निधन (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)

१९८१ : इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ सुभाष मुखर्जी याचे निधन (जन्म: १६ जानेवारी १९३१)

१९६५ : इंसुलिनचे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचे निधन (जन्म: २० नोव्हेंबर १८९२)

१९२२ : १९वे योकोझुना, जपानी सुमो हिताचियाम टॅनियमों यांचे निधन (जन्म: १९ जानेवारी १८७४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos