महत्वाच्या बातम्या

 वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उद्या चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे १८ जून २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री ॲड. जयस्वाल हे १८ जून रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथे पोहोचणार आहेत. त्यानंतर ते वस्तू व सेवाकर (GST) विभागाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील कर प्रशासनाच्या सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यानंतर दुपारी १ ते २ वाजेपर्यंत त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता ते चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी आवश्यक तयारी सुरू केली असून, कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos